सांगली – बापू बिरु वाटेगावकर यांचं दीर्घ आजाराने मंगळवारी निधन झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाविरोधात ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी लढा दिला होता. ते १०२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पायावर सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सुरूवातीला बापू बिरू वाटेगावकर दरोडे घालण्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्रात कुप्रसिद्ध होते. तसेच पोलिसांच्या तावडीतून निसटले होते. मात्र ते सातत्याने गरीबांना मदत करत होते. मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ते पेटून उठायचे. दरोडे आणि हत्यांप्रकरणी त्यांना शिक्षाही झाली होती. त्यांच्या आयुष्यावर चित्रपटही काढण्यात आला आहे.
COMMENTS