बंगालमध्ये काॅंग्रेसची डाव्यांशी दोस्ती

बंगालमध्ये काॅंग्रेसची डाव्यांशी दोस्ती

नवी दिल्ली – पश्चिच बंगाल होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमुल काँग्रेसशी लढण्यासाठी काॅंग्रेस आणि डाव्यांनी हातात हात घालून लढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काॅंग्रेस हाय कमांडने परवानगी दिली आहे. यामुळे आता बंगालच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे, अशी माहिती लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली

पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सन २०१६ मध्ये काॅंग्रेसला ९० जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी ४४ जागांवर काॅंग्रेसने विचिजय मिळला होता. तर डाव्यांनी २०४ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी २६ जागी त्यांचा विजय झाला होता.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, काँग्रेसने परत एकदा डाव्यांसोबत मिळून तृणमूल सरकारविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी जितिन प्रसाद म्हणाले की, आमची आघाडी संपूर्ण ताकतीने तृणमूल आणि भाजपविरोधात लढेल आणि बंगालच्या त्या गौरवाला पर आणले, ज्याला या दोन्ही पक्षांनी नष्ट केले आहे.

2016 मध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत निवडणुक लढवली होती. तेव्हा या आघाडीला 44 जागा मिळाल्या होत्या. परंतू, तेव्हापासून काँग्रेसचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार तृणमूलमध्ये सामील झाले आहेत. यावेळेस काँग्रेस किती जागांवर लढेल, हे अद्याप ठरलेले नाही. परंतू, सूत्रांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसला बरोबरीचा वाटा मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS