कोल्हापूर : विधीमंडळाचे अधिवेशन काही तासांवर आले असताना महाविकास आघाडी सरकारला घेण्यासाठी भाजपने रणनिती आखली असून आज राज्यभर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याच्या मागणी चक्का जाम आंदोलन केले. दरम्यान, आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा, मराठा आरक्षण यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचं रान उठवू,” असा इशारा दिला. मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील सहा मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई होत नाही, असं ते म्हणाले.
धनंजय मुंडे प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, वीज बिल या सगळ्या मुद्द्यावरुन सरकारला आम्ही घेरणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोरोना काळात झालेले भ्रष्टाचार हा मुद्दा देखील अधिवेशनात उचलणार आहोत. महाराष्ट्र सरकारने इंधनावर लावलेले कर जास्त आहेत. आम्ही इंधनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार आहे, असं पाटील पुढे म्हणाले.
COMMENTS