नवी दिल्ली – संपूर्ण देशात 4 लाख 13 हजार 760 एवढी भिका-यांची संख्या असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिका-यांची संख्या असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी देशभरातील भिका-यांची यादी जाहीर केली आहे. तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर भिका-यांची संख्या असल्याचं या अहवालातून उघड झालं आहे. एकूण ४ लाख १३ हजार ७६० भिका-यांपैकी २ लाख २१ हजार ६७३ पुरुष भिकाऱ्यांचा समावेश असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भिका-यांची संख्या
पश्चिम बंगालमध्ये ८१ हजार २४४ भिकारी आहेत.
उत्तर प्रदेशात ६५ हजार ८३५ भिकारी
बिहारमध्ये २९ हजार ७२३ भिकारी
महाराष्ट्रातील भिका-यांची संख्या
महाराष्ट्रात एकूण २४ हजार ३०७ भिकारी असल्याची माहिती गेहलोत यांनी दिली आहे.
West Bengal has the highest number of beggars,vagrants in India followed by Uttar Pradesh and Bihar at number 2 and 3 respectively: Reply of Social Justice Minister Thawar Chand Gehlot in Lok Sabha today pic.twitter.com/uI1GpyLKNp
— ANI (@ANI) March 20, 2018
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील भिका-यांची संख्या
उत्तराखंड – ३३२० भिकारी
हिमाचल प्रदेशात – ८०९ भिकारी
दिल्लीत – २१८७ भिकारी
पूर्वोत्तर राज्यात भिकाऱ्यांची संख्या कमी
अरुणाचल प्रदेश – ११४,
नागालँडमध्ये – १२४
मिझोराममध्ये – ५३ भिकारी
दीव-दमणमध्ये २२ तर
लक्षद्वीपमध्ये – दोन भिकारी
COMMENTS