आता सरपंचांना सरकारकडून स्कूटी मिळणार !

आता सरपंचांना सरकारकडून स्कूटी मिळणार !

मुंबई – हरियाणा येथील उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये उल्लेखणीय कामगिरी करणाय्रा महिला सरपंचांसाठी मोठी घोषणा केली आहे. ग्रामपंचायतीमधील महिला प्रतिनीधींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सरकारकडून स्कूटी देण्याची घोषणा चौटाला यांनी केली आहे. उल्लेखणीय कामगिरी करणाय्रा 100 महिला सरपंचांना सरकारडून स्कूटी देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद आणि ब्लॉक समिती सदस्य हे या महिला सरपंचांची यादी तयार करत असून या महिन्यात त्यांना स्कूटी देण्यात येणार आहे.

दरम्यान राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक,
शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढत आहे. या गुणवत्ता वाढीत महिला सरपंच आणि प्रतिनीधी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या महिलांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासामध्ये वाढ होण्यास मदत होणार असल्याचं चौटाला यांनी म्हटलं आहे.
या महिलांच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद,ब्लॉक समिती व पंचायत स्तरावरील आपल्या आपल्या गावात आणि वार्डात मोठी सुधारणा होत आहे. या महिलांचा गौरव केला तर यामध्ये आणखी भर पडणार आहे. त्यामुळे यामधील टॉप 100 महिला प्रतिनीधींना या महिन्यात हॉण्डा कंपनीच्या 100 स्कूटी देण्यात येणार असल्याचं चौटाला यांनी म्हटलं आहे.

COMMENTS