काळा पैशाचा पर्दाफाश करणा-या पनामा पेपर्सनंतर आता पॅराडाईज पेपर्स उजेडात आलेत. जपानच्या एका वृत्तपत्राच्या हवाल्यानं इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकानं हे वृत्त दिलं आहे. जगभरातील 96 माध्यमसमूहांनी या पेपर्ससाठी काम केले आहे. काळापैशांच्या यादीत जगातील अब्जाधीशांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यास त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि भारतातील राजकारण्यांसह 714 जणांचा समावेश आहे. बर्म्युडामधील अपलबॉय आणि सिंगापूरमधील एशियासिटी या कायदेशीर सल्ला देणा-या दोन कंपन्यांच्या पेपर्समधून ही माहिती पुढे आली आहे.
भारतातील 714 जणांमध्ये काही राजकारणी, उद्योग जगत आणि बॉलिवडूमधील श्रीमंतांचा समावेश आहे. या भारतीयांसह जगभरातील श्रीमंत लोकांनी आपली संपत्ती लपवण्यासाठी आणि कर चुकवण्यासाठी हा पैसा परदेशात पाठवल्याचं उघड झालं आहे. हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन, विजय मल्ल्या, नीरा राडिया यांच्यासह काँग्रेसचे राजस्थानमधील नेते सचिन पायलट, किर्ती चिद्मबरम्, वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्या संबधित कंपन्यांचाही समावेश आहे.
कॉर्परेट जगतामध्ये व्हिडिओकॉन, एस्सार ग्रूप, जिंदाल स्टील, हिरानंदानी, हिंदुजा, अपोलो टायर्स यासह अनेक कंपन्यांची नावे आहेत.
COMMENTS