काँग्रेस आमदाराला येडियुरप्पांची ऑफर, कोचीला जाऊ नको तुला मंत्रिपद देतो, ऑडिओ क्लीप व्हायरल !

काँग्रेस आमदाराला येडियुरप्पांची ऑफर, कोचीला जाऊ नको तुला मंत्रिपद देतो, ऑडिओ क्लीप व्हायरल !

बंगळुरु – बहूमत सिद्ध करण्यासाठी आज मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची अग्निपरीक्षा आहे. यासाठी येडियुरप्पांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असल्याचं समोर आलं असून याबाबतची ऑडिओ क्लीप काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे आमदार बी. पाटील यांना फोन करुन कोचीला जावू नका परत या तुम्हाला मंत्रीपद देतो अशी ऑफर दिल्याचा उल्लेख आहे.

बी. पाटील – हॅलो … हॅलो … हॅलो … त्यांना फोन द्या (फोन उचललेल्या माणसाला)

येडियुरप्पा – हॅलो…

बी. पाटील – आण्णा नमस्कार, अभिनंदन

येडियुरप्पा – आपण कुठे आहात?

बी. पाटील – बसमध्ये आहे, कोचीला जातोय.

येडियुरप्पा – कोचीला जाऊ नका, परत या तुम्हाला मंत्रिपदासह तुम्ही मागाल ते देतो.

बी. पाटील – अण्णा.. ठीक आहे.. आपण आता मला बोललात..परंतु पुढे काय करायचे ते सांगा..

येडियुरप्पा : मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगतो. मी त्यासाठीच हे करत आहे. तुम्ही आता परत या कोचीला जाऊ नका.

बी. पाटील : पण आम्ही बसमध्ये आहोत.

येडियुरप्पा : जाऊ नका, काही निमित्त बनवा आणि परत या.

बी. पाटील : मी आलो तर माझे मंत्रिमंडळात स्थान काय असेल ?

येडियुरप्पा : तुम्हाला मंत्री बनवणार.

बी. पाटील : अण्णा माझ्याबरोबर अन्य 3 लोक आहेत.

येडियुरप्पा : त्यांनाही बरोबर घेऊन या, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना?

बी. पाटील : होय.. होय..

येडियुरप्पा : आता परत या, बसमध्ये जाऊ नका.

बी. पाटील : ठीक आहे, अण्णा ठीक…

येडियुरप्पा : जर तुम्ही कोचीनला गेलात तर तुमच्याशी संपर्क करणे शक्य होणार नाही.

बी. पाटील : ठीक आहे… ठीक आहे… अण्णा

येडियुरप्पा : आता तुम्ही काय करणार आहात ते सांगा?

बी. पाटील : मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये परत कॉल करतो आणि सांगतो.

COMMENTS