…येडियुरप्पा तोडणार आपलाच रेकॉर्ड !

…येडियुरप्पा तोडणार आपलाच रेकॉर्ड !

नवी दिल्ली  कर्नाटकचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना उद्या चार वाजेपर्यंत बहूमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ते उद्या ४.०० वाजता राज्य विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत. जर येडियुरप्पा सदनात बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरले तर ते आपलाच जुना  रेकॉर्ड तोडण्यापासून दूर राहतील. परंतु, जर त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही तर ते आपलाच ‘रेकॉर्ड’ तोडणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते कर्नाटकातील सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर २००७ मध्ये मोडतोड करत भाजपनं जेडीएससोबत हातमिळवणी केली होती. परंतु, येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर अवघ्या सात दिवसांच्या आतच जेडीएसनं आपलं समर्थन मागे घेतल्यानं येडियुरप्पांचं सरकार कोसळलं होतं.त्यामुळे  उद्या पुन्हा एकदा येडियुरप्पा बहूमत सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले तर ते यंदा सात दिवसांच्याऐवजी अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे ते आपला जुनाच रेकॉर्ड तोडतील असं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान भाजपकडे १०४ आमदार आणि एक अपक्ष आमदार असे १०५ आमदार आहेत. त्यामुळे ११२ चा जादूई आकडा कसा पार करणार याची उत्सुकता लागली आहे.

COMMENTS