कर्नाटकात भाजपची सत्ता, येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ !

कर्नाटकात भाजपची सत्ता, येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ !

कर्नाटक – कर्नाटकामध्ये सुरु असलेलं राजकीय नाट्य अखेर संपलं असून आज याठिकाणी भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी बंगळुरू येथील भाजपा कार्यालयात काही नेत्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी बंगळुरू येथील काडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन पूजाही केली.

दरम्यान कर्नाटकातील 17 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटक सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान कुमारस्वामी यांच्यासमोर होते. परंतु कुमारस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आज सकाळीच येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

COMMENTS