विधान परिषेदच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा भाजपला आणखी एक दणका !

विधान परिषेदच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा भाजपला आणखी एक दणका !

यवतमाळ – काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या विधान परिषदच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला दणका दिला होता. नागपूरसह विधान परिषदेच्या सहा पैकी तब्बल चार जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या. भाजपला केवळ धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजय मिळाला होता. तर एका ठिकाणी अपक्षाची सरशी झाली होती. या पराभवातून भाजप सावरतो न सावरतो तोपर्यंत महाविकास आघाडीनं भाजपला आणखी एक दणका दिला आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार विजय मिळवला आहे. एकूण 21 पैकी तब्बल 15 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत. माजी मंत्री मदन येरावार आणि यांच्यासह भाजपच्या 6 आमदारांनी महाविकास आघाडीतील नाराजांना घेऊन जिल्हा बँकेत पॅनल उभं केलं होतं. मात्र तरीही त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. महाविकास आघाडीकडून मंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक संचालक काँग्रेसचे निवडूण आल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा दबदबा कायम राहणार आहे.

COMMENTS