राजकोट – माझ्या उपजीविकेसाठी मी चहा विकला देश नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला. राजकोट येथील रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. काही दिवसांपूर्वी ‘युवा देश’ या ‘इंडियन युथ काँग्रेस’च्या ऑनलाईन मॅगझिनच्या ट्विटर पेजने मोदींवर मेमेच्या माध्यमातून हल्ला चढवला होता.
यावेळी मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने एकाही गुजाराती नेत्याचा स्वीकार केला नाही, जनसंघाच्या पाठिंब्यामुळे पटेल समाजाचे बाबुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसला हे आवडले नाही आणि त्यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. जेव्हा सौराष्ट्र यांचे पुत्र केशुभाई पटेल हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना स्थानभ्रष्ट करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आनंदीबाई पटेल यांच्यासोबतही काँग्रेसने असेच केले.’
पुढे आम आदमी पक्षावर निशाणा साधताना मोदी म्हणाले, ‘दिल्लीत एक नवीन पक्ष विराजमान झाला आहे. केवळ टीका करणे आणि पळ काढणे हेच या पक्षाचे काम आहे. मला वाटले होते, काँग्रेस हा जुना पक्ष असल्याने अशा राजकारणात तो सहभागी होणार नाही. परंतु, त्यांनीदेखील हाच शॉर्टकट अवलंबला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून ते रेटून खोटे बोलत आहेत.’
हां, मैंने चाय बेची है लेकिन उनकी तरह देश बेचने का पाप नहीं किया। pic.twitter.com/1Wxvmv7ppF
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2017
COMMENTS