लखनौ – उत्तर प्रदेशातील योगी सरकार हे सर्व राजकीय रेकॉर्डमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात बदल करणार आहे. या सरकारनं भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नावात ‘रामजी’ जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ यांचं नाव बदलून ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ करण्यासाठी, सर्व विभाग आणि अलाबाहाद-लखनौमधील हायकोर्टाच्या सर्व खंडपीठांना युपी सरकारनं आदेश दिले असल्याची माहिती आहे. “संविधानाच्या पानांमध्ये बाबासाहेबांची डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाने स्वाक्षरी असल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा योग्य उच्चर व्हायला हवा. इंग्लिशमध्ये त्यांच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे. पण हिंदीत त्यांचं नाव योग्य पद्धतीने लिहिलं जावं. ‘अंबेडकर’ न लिहिता ‘आंबेडकर’ लिहायला हवं. तसेच रामजी त्यांच्या वडिलांचं नाव होतं. महाराष्ट्र आणि भारतीय परंपरेत मुलाच्या नावानंतर वडिलांचं नाव लिहितात त्यामुळे बाबासाहेबांच्या नावात बदल करुन त्यांचं पूर्ण नाव लिहिण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यपाल राम नाईक यांनी डिसेंबर 2017 मध्ये या अभियानाला सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि महासभेला पत्र लिहून आंबेडकरांच्या नावाचा योग्य उच्चार आणि योग्य नाव लिहिण्याकडे लक्ष वेधलं होतं. अशी माहिती डॉ. भीमराव आंबेडकर महासभेचे संचालक डॉ. लालजी प्रसाद निर्मल यांनी दिली आहे.
COMMENTS