योगी आदित्यनाथ सरकारचं नववधूला अनोखं गिफ्ट!

योगी आदित्यनाथ सरकारचं नववधूला अनोखं गिफ्ट!

उत्तर प्रदेश – देशभरात विविध राजकारण्यांकडून तसेच राज्य सरकारकडून दरवर्षी विवाह सोहळे आयोजित केले जातात. या विवाह सोहळ्यात नववधू आणि तिच्या संसारासाठी आवश्यक असणारं साहित्यही दिलं जातं. उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडूनही विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. या विवाह सोहळ्यासाठी योगी सरकानं नववधूला अनोखं गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेत नववधूला एक मोबाईल आणि ३५ हजार रुपयांची रोख रक्कम गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे.

योगी आदित्यनाथ सरकारच्या या नव्या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून करण्यात येणार आहे. योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला 20 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. तसेच कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असं एकूण 10 हजार रुपयांचं सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येणार आहे.. या योजनेसाठी प्रशासनाकडे एक कोटी 66 लाख 60 हजार रुपयांचा निधी देखील जमा करण्यात आला आहे.

COMMENTS