आयोध्या – राम मंदिरासाठी यात्रा काढणारे आणि भाजपच्या हातात सत्ता द्या राम मंदिर आम्ही तातडीने बांधू म्हणणारे भाजपचे नेते आता राम मंदिर बांधण्यासाठी रामाच्याच कृपादृष्टीची वाट पाहत आहेत. जेंव्हा प्रभू रामचंद्रांची कृपादृष्टी होईल तेंव्हा नक्की राम मंदिर बांधले जाईल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आयोध्येमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंदिर नक्की बांधू त्याबाबत संतांनी तरी अविश्वास दाखवू नये असं आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
When Lord Ram will shower his blessings on Ayodhya, the Ram Mandir will definitely be built & there should be no doubt about it. At least there shouldn't be any doubt among saints: UP CM Yogi Adityanath in Ayodhya pic.twitter.com/dSdbHjLTtM
— ANI UP (@ANINewsUP) June 25, 2018
मंदिरच्या प्रश्नावर काँग्रेस दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे काही नेते कोर्टात गेले आहेत. त्यांनी राम मंदिर प्रश्नाची सुनावणी 2019 च्या नंतर घेण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काही काँग्रेसचे नेते मंदिर केंव्हा होणार असा सवाल भाजपला करत आहेत असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. काँग्रेसची कूटनिती संतांनी समजून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करत असतात. या वाक्याचीच आठवण करुन देणारं योगी आदित्यनाथ यांचं हे वक्तव्य आहे.
COMMENTS