मुंबई विद्यापीठात युवासेनेला आणखी एक यश !

मुंबई विद्यापीठात युवासेनेला आणखी एक यश !

मुंबई – मुंबई विद्यापीठात युवासेनेला आणखी एक यश आलं असून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर युवासेनेचे प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने १० पैकी १० जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला होता. यानंतर व्यवस्थापन परिषद निवडणुकीसाठी सिनेट सदस्य प्रदीप सावंत खुल्या प्रवर्गातून तर राजन कोळंबेकर यांनी इतर मागास प्रवर्गातून युवासेनेकडून अर्ज दाखल केले होते. यामध्ये त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई विद्यापीठात प्रदीप सावंत यांनी गेल्या पाच वर्षांत सिनेट सदस्य, विद्यार्थी तक्रार निवारण समिती सदस्यपदी काम केलं आहे. तर राजन कोळंबेकर यांनीदेखील सिनेट सदस्य आणि स्पोर्ट कमिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केलं आहे. या दोघांचीही बिनविरोध निवड झाल्यामुळे मुंबई विद्यापीठात युवासेनेचं हे दुसरं यश मानलं जात आहे.

 

COMMENTS