मुंबई विद्यापीठात युवासेनेचा इतिहास, सिनेटवर 10 पैकी 10 जागा जिंकल्या !

मुंबई विद्यापीठात युवासेनेचा इतिहास, सिनेटवर 10 पैकी 10 जागा जिंकल्या !

मुंबई – मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव झाला असून युवासेनेनं दहापैकी दहा जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठात युवासेनेनं इतिहास रचला आहे. सत्तेच्या जोरावर आपणच सिनेटची निवडणूक जिंकणार या विश्वासावर असणा-या अभाविपला युवासेनेनं पराभवाची धूळ चारली आहे. सत्तेत असल्यामुळे सिनेटमध्येही आपलाच विजय होणार असल्याचा आत्मविश्वास अभाविपला होता. परंतु जोरदार मुसंडी मारत युवासेनेनं अभाविपला धोबीपछाड केलं आहे.

दरम्यान या निवडणुकीत राखीव प्रवर्गातील युवा सेनेच्या शीतल सेठ- देवरूखकर, शशिकांत झोरे, निखिल जाधव, धनराज कोह्चडे, राजन कोळंबेकर हे विजयी झाले आहेत. तसेच 2010 साली देखील युवासेनेनं ही निवडणूक जिंकली होती. यंदा युवासेनेसमोर अभाविप आणि काँग्रेसप्रणित एनएसयूआयच्या उमेदवारांचं तगडं आव्हान होतं. पण युवासेनेनं जोरदार मुसंडी मारत या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला आहे. 25 मार्च रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी एकूण 62 हजार पदवीधर मतदारांनी मतदान केलं होतं.

 

COMMENTS