जिल्हा परिषद निवडणुकीत मविआची सरशी, भाजपनं बालेकिल्ला गमावला, वाचा अंतिम निकाल!

जिल्हा परिषद निवडणुकीत मविआची सरशी, भाजपनं बालेकिल्ला गमावला, वाचा अंतिम निकाल!

मुंबई – पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपैकी चार जिल्हा परिषदांवर महाविकास आघाडीला तर केवळ एका जिल्हापरिषदेवर भाजपाला वर्चस्व राखता आलंय. धुळ्यात भाजपनं एकहाती विजय मिळवला. मात्र भाजपला नागपूरचा गड राखता आला नाही. नागपुरात काँग्रेसनं बाजी मारली. पालघरमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. तर अकोल्या वंचित सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि वाशिममध्येही वंचितनं चांगली मजल मारल्यानं या ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे.

पालघर जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर नंदुरबार, नागपूर, वाशिम या जिल्हा परिषदांवरही महाविकासआघाडीला सत्ता मिळवण्यात यश आलं आहे. तर धुळ्यात भाजपने जिल्हा परिषदेवर विजय मिळवला आहे. तसेच अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याची शक्यता दिसत आहे. सहापैंकी पाच ठिकाणी पराभव झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय.

नागपूर जिल्हा परिषद

जिल्हा परिषद एकूण जागा-

58निकाल जाहीर – 58
काँग्रेस : 30
राष्ट्रवादी : 10
भाजप : 15
शिवसेना : 01
अपक्ष : 01
शेकाप : 01

धुळे जिल्हा पूर्ण अपडेट निकाल धुळे जिल्हा परिषद निकाल

एकूण जागा : 56निकाल जाहीर : 56

शिवसेना : 4

भाजप : 39

राष्ट्रवादी : 3

अपक्ष : 03

काँग्रेस : 7

पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा : 57
निकाल जाहीर : 57
शिवसेना : 18

माकपा: 6

भाजप : 10

राष्ट्रवादी : 15

बविआ : 04

मनसे : 0

अपक्ष : 03

काँग्रेस : 1

नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल – एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 56

काँग्रेस 23
भाजपा 23
शिवसेना 7
राष्ट्रवादी 3
अपक्ष

वाशिम जिल्हा परिषद एकूण जागा -52

जाहीर झालेला निकाल-52

राष्ट्रवादी 12
भाजपा -07
काँग्रेस -09
शिवसेना -06
वंचित बहुजन आघाडी – 08
जनविकास आघाडी- 06
अपक्ष- 03
स्वाभिमानी-01

अकोला

एकूण जागा – 53

जाहीर झालेले निकाल.
भाजपा – 7
काँग्रेस – 5
शिवसेना – 11
राष्ट्रवादी – 3
माकप –
वंचित – 22
जनविकास आघाडी -1
अपक्ष- 4

COMMENTS