‘या’ जिल्हा परिषदांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता !

‘या’ जिल्हा परिषदांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता !

मुंबई – राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. असं असतानाच पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांमध्ये दिलेले 50 टक्क्यांपेक्षा जादाचे आरक्षण नियमबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या जिल्हा परिषदांची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे.

राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषदांमध्ये जागा राखीव असतात. मात्र हे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होता कामा नये असा नियम आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदांमध्ये हे आरक्षण 60 ते 100 टक्क्यांपर्यंत गेलं आहे. 50 टक्क्यांपेक्षा जादाचे आरक्षण नियमबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.त्यामुळे आता या जिल्हा परिषदांची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे.

COMMENTS