जिल्हा परिषदेतील एका सदस्यांला भूम उपविभागीय अधिकाऱ्यांनी ११ जानेवारी रोजी हद्दपार केले आहे. त्यामुळे तो सदस्य कोण, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असून एका आमदाराचा अत्यंत विश्वासू जिल्हा परिषद सदस्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. त्याला उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
दरम्यान येत्या २९ जानेवारीला जिल्हा परिषदेतीच सर्वसाधारण सभा होणार आहे. त्याला हा सदस्य उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्यावर वाशी, भूम तसेच जेजुरी (ता. पुणे) येथे गुन्ह्याची नोंद आहे. गावातील गोरगरीब स्त्रीयांचे विनयभंग करणे, अल्पवयीन मुलीस पळवून नेने, घरात घुसून मारहाण करणे, बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रवृत्त करणे, प्राणघातक शस्त्रांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी प्रकारचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यामुळे हा जिल्हा परिषद सदस्य कोण, याताबाबत राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
COMMENTS