झेडपी निवडणुकीत नेमकं काय झालं ? कुणाला फटका, कुणाला फायदा ?
मुंबई – ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 जागांवर निवडणूक होऊन त्यांचे निकाल लागले. काही अपवाद वगळता बहुतेक सर्वच पक्षांनी सगळीकडे ओबीसी उमेदवार दिले होते. त्यामुळे अर्थात काही अपवाद वगळता सगळीकडे ओबीसी उमेदवार जिंकले आहेत. या निकालामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामध्ये कुठेही बदल झालेला नाही. मात्र महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते आमच्यावरच महाराष्ट्रातल्या जनतेनं विश्वास टाकला असा दावा करत आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचा आधार घेत आपण नेमकी वस्तूस्थिती काय आहे याचा आढावा घेऊ..
जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी 30 जागा भाजपकडे होत्या. मात्र भाजपाला केवळ 22 जागाच जिंकता आल्या. तब्बल 8 जागांचं नुकसान भाजपला झालं आहे. शिवसेनेच्या 9 जागा रद्द झाल्या होत्या. त्यांनी 12 जागा जिंकल्या. सेनेला 3 जागांचा फायदा झाला. काँग्रेसच्या 13 जागा रद्द झाल्या होत्या. त्यामध्ये 4 ची भर घालत काँग्रेसनं 17 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीनं 16 च्या 18 जागा केल्या. म्हणज्येच त्यांनाही 2 जागांचा फायदा झाला. बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्वबळावरच लढले होते. वंचित बहुजन आघाडीला फटका बसला आहे. त्यांच्या 12 जागा रद्द झाल्या होत्या त्यापैकी त्यांना केवळ 8 जागा जिंकता आल्या आहेत. त्यांचे दोन बंडखोरही विजयी झाले आहेत.
राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोणाला फायदा आणि कोणाला तोटा याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
राज्यात झेडपीच्या पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा 85
पक्ष रद्द झालेल्या जागा जिंकलेल्या जागा
भाजप 30 22 (आठ जागांचा तोटा)
काँग्रेस 13 17 (तीन जागांचा फायदा)
एनसीपी 16 18 (दोन जागांचा फायदा)
सेना 09 12 ( तीन जागांचा फायदा)
वंचित 12 08 (चार जागांचा तोटा)
इतर 05 08 (तीन जागांचा फायदा)
…………………………………………………………………………………………………………..
नागपूर जिल्हा परिषद
पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा 16
पक्ष रद्द झालेल्या जागा जिंकलेल्या जागा
भाजप 4 3 (एका जागेचा तोटा)
काँग्रेस 7 9 (दोन जागेचा फायदा)
एनसीपी 4 2 (दोन जागांचा तोटा)
शेकाप 1 1
इतर 00 01 (एका जागेचा फायदा)
……………………………………………………………………………………………………………
अकोला जिल्हा परिषद
पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा 14
पक्ष रद्द झालेल्या जागा जिंकलेल्या जागा
भाजप 3 1 (दोन जागांचा तोटा)
काँग्रेस 1 1
एनसीपी 1 2 (एका जागेचा फायदा)
सेना 1 1
वंचित 8 6 (दोन जागांचा तोटा)
प्रहार 0 1 (एका जागेचा फायदा)
इतर 00 02 (दोन जागेचा फायदा. दोघेही वंचित बंडखोर)
……………………………………………………………………………………………………………………
वाशिम जिल्हा परिषद
पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा 14
पक्ष रद्द झालेल्या जागा जिंकलेल्या जागा
भाजप 2 2
काँग्रेस 1 2 (एका जागेचा फायदा)
एनसीपी 3 5 (दोन जागांचा फायदा)
सेना 1 1
वंचित 4 2 (दोन जागांचा तोटा)
इतर 03 02 (एका जागेचा तोटा)
…………………………………………………………………………………………………….
धुळे जिल्हा परिषद
पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा 15
पक्ष रद्द झालेल्या जागा जिंकलेल्या जागा
भाजप 11 8 (तीन जागांचा तोटा)
काँग्रेस 2 2
एनसीपी 0 3 (तीन जागांचा फायदा)
सेना 2 2
……………………………………………………………………………………………….
नंदूरबार जिल्हा परिषद
पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा 11
पक्ष रद्द झालेल्या जागा जिंकलेल्या जागा
भाजप 7 4 (तीन जागांचा तोटा)
काँग्रेस 2 3 (एका जागेचा फायदा)
एनसीपी 0 1 ( एका जागेचा फायदा)
सेना 2 3 (एका जागेचा फायदा)
………………………………………………………………………………………………….
पालघर जिल्हा परिषद
पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा 15
पक्ष रद्द झालेल्या जागा जिंकलेल्या जागा
भाजप 3 4 (एका जागेचा फायदा)
एनसीपी 8 5 (तीन जागांचा तोटा)
सेना 3 5 (दोन जागांचा फायदा)
माकप 01 01
………………………………………………………………………………………
COMMENTS