अजूनही मनात अस्वस्थता आहे – मुख्यमंत्री फडणवीस

अजूनही मनात अस्वस्थता आहे – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यात युती सरकारची स्थापन झाल्यानंतर गेल्या तीन वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना केलेल्या कामाचे समाधान वाटत आहे, मात्र राहिलेल्या कामाबद्दल मोठी अस्वस्थता मनात आहे. खूप काम करायचे बाकी आहे. हाती घेतलेली कामे येत्या दोन वर्षात मार्गी लावायची आहेत. ही कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे, मात्र ती पुढील दोन वर्षात नक्की पूर्ण केली जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एका वृत्तवाहिनीला आज दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतीसमोरची आव्हाने मोठी असून शेती शाश्वत केल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत. त्या दृष्टीने सरकारने काम सुरू केले आहे. राज्यातील शेतकरी एकावेळी दोन-तीन पिके घेतो. तीन वर्षात शेती क्षेत्रातील गुंतवणुकीत तीन पटीने वाढ करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत कार्यक्रम गरजेचे आहे. शेती शाश्वत झाल्यानंतर आत्महत्या थांबतील. शेतीचा विकासदर १२ टक्क्यांनी वाढला आहे. सिंचनावर पूर्वी फक्त पैसे खर्च व्हायचे, आता रेकॉर्डब्रेक सिंचन प्रकल्प सुरु केले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

COMMENTS