अभिनेता विजयच्या चाहत्याला मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अटक

अभिनेता विजयच्या चाहत्याला मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अटक

अभिनेता विजयच्या चाहत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या चाहत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. श्रीविल्लीपुतुर येथील भाजपचे सचिव के मरिमुथू यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव थिरूमुर्गन असून त्याने अभियांत्रिकी शाखेतून पदविकेपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्याच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायदा, २००० नुसार आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याचा आणि सार्वजनिक गैरवर्तणुकीसाठी सीआरपीसीमधील ५०५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल आहे. थिरूमुर्गन याने प्रायव्हेट चॅट आणि मेसेंजर सेवेचा उपयोग करून मोदींविरूद्ध बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मर्सल’ हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर या वादाला सुरूवात झाली होती. भाजपच्या नेत्यांनी या चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सोशल मीडियावर भाजप नेते आणि विजयच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले होते.

 

COMMENTS