अखेर अमित शाह ‘मातोश्री’वर जाणार, रविवारी उद्धव ठाकरेंसोबत खलबतं !

अखेर अमित शाह ‘मातोश्री’वर जाणार, रविवारी उद्धव ठाकरेंसोबत खलबतं !

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपची सध्या जोरदार जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्वसहमतीने निवडला जावा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचा प्रय़त्न आहेत. त्यामुळे थेट सोनिया गांधी यांचीही भाजप नेते भेट घेणार आहेत. मात्र विरोधकांकडून साथ मिळाली नाही तर आपल्याकडे मतांची बेगमी असावी म्हणून आता मित्र पक्षांना चुचकारण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्रच्या दौ-यावर उद्या मुंबईत येत आहेत. रविवारी शहा हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्यपूर्वी अमित शहा हे मातोश्रीवर गेले होते. म्हणजेच जवळपास तीन वर्षानंतर शाह हे मातोश्रीवर जात आहेत. पूर्वी शिवसेना राज्यात मोठा पक्ष होता तेंव्हा भाजपचा केंद्रातील मोठा नेता मुंबईत आल्यावर मातोश्रीवर  भेटायला जात असे, मात्र नेरंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ही परंपरा मोडीत काढली होती. आता पुन्हा एकदा शाह मतांची बेगमी करण्यासाठी मातोश्रीवर जात आहेत. दोन्ही पक्षातले ताणलेले संबंध पाहता उद्धव ठाकरे त्यांना किती प्रतिसाद देतात ते पहावं लागेल.

COMMENTS