उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा, नितेश राणे यांनी केला अर्ज !

उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा, नितेश राणे यांनी केला अर्ज !

बातमीचं टायटल वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल, पण संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुमचा हा गोंधळ दूर होईल. खरचं नितेश राणे यांनी अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या संबधितांकडे पत्रही पाठवलं आहे. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकराचा पाठिंबा काढणार असं वक्तव्य केलं आहे. जगातली कुठल्याही राजकीय नेत्याने एवढ्या वेळेला हे वाक्य म्हटलं नसेल. उद्धव ठाकरे यांचे हे रेकॉर्डच आहे. त्यामळे त्याची नोंद घ्यावी आणि उद्धव  ठाकरे यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी अशी मागणी त्यांनी त्यांनी पत्रद्वार केली आहे. नितेश यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

COMMENTS