उस्मानाबाद आणि नांदेड मधील 30 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

उस्मानाबाद आणि नांदेड मधील 30 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

नांदेडमधील आज 13 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर उस्मानाबाद मधील भूम नगरपरिषद मधील 17 नगरसेवक आणि पदाधिका-यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपाने निवडणूकपूर्व तयारी सुरु केली आहे. ‘1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत 36 जिल्ह्यात दौरा करून पक्ष संघटनेच काम करणार. प्रत्येक बुध पर्यन्त पक्ष जाईल. एक बूथ 25 यूथ या संकल्पनेवर पक्ष काम करणार आहे. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.

‘जर पक्षात कोणाला प्रवेश करायचा असेल पक्षाला कोणतीही अडचण नाही.’  नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर दानवे यांनी सकारात्मक उत्तर दिले. आज प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनात्मक ठराव होतील. राजकीय मुद्द्यांवर चर्चा नाही. नेहमी प्रमाणे ही कार्यकारिणीची बैठक असेल. असे दानवेंनी सांगितले.

नांदेड राजीनामे दिलेले 13 नगरसेवक मुंबई इथं अधिकृतरित्या भाजपात दाखल झाले. यात सेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगरप्रमुख महेश खोमने यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

COMMENTS