उस्मानाबाद – आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन कर्जमाफीसाठी मुंबई यात्रा

उस्मानाबाद – आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन कर्जमाफीसाठी मुंबई यात्रा

उस्मानाबाद – आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी विजय जाधव हा तरुण शेतकरी टुव्हीलरवरून अस्थिकलश यात्रा घेऊन नागपूर मार्गे मुंबईला निघाला आहे. साक्राळी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील जाधव अत्यल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांनाही शेतीतील अडचणी सातत्याने जाणवतात. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्याला सशक्त करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसेच उत्पादन वाढविण्यावरही त्यांनी भर दिला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मालाला भावच मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नैराष्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नसल्याचेही जाधव सांगतात. विशेष म्हणजे त्यांनी टुव्हीलरवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे फोटो, अस्थिकलश लावले आहेत. तसेच शेतीच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. स्वःखर्चाने त्यांनी ही यात्रा काढली आहे. नागपूर मार्गे मुंबईला जावून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचेही जाधव यांनी  उस्मानाबाद शहरात आल्यानंतर सांगितले.

COMMENTS