कोर्टाचाच बनला आखाडा, न्यायाधिशांनीच एकमेकांना सुनावली शिक्षा !

कोर्टाचाच बनला आखाडा, न्यायाधिशांनीच एकमेकांना सुनावली शिक्षा !

देशात दररोज लाखो खटले सुरू असतात. त्यात विविध न्यायालये दोषींना शिक्षा सुनावणात. मात्र न्यायालयचं न्यायालयाच्या विरोधात उभे ठाकली तर !  वाचून धक्का बसला ना ! मात्र हे खऱं आहे.  न्यायमूर्तींनी एकमेकांना तब्बल 6 महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती सी एन कर्नान यांनी चक्क भारताचे सरन्यायाधीश जे ए खेहर यांच्यासह सुप्रीम कोर्टातील 7 न्यायाधिशांना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आपण दलित असल्यामुळे जाणून बुजून सुप्रीम कोर्ट सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत या ७ जजेस यांना कर्णन यांना शिक्षा सुनावली आहे.

कोणत्या कायद्याखाली सुनावली शिक्षा ?

– मानसिक संतुलन बिघडले आहे का, असा सवाल ३१ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने विचारला आहे.

– कोर्टामध्ये माझे मानसिक संतुलन काढणे, हे वाक्य सुद्धा अवमानना करणारे आहे.

– मी दलित समाजाचा असल्यामुळे माझ्याबद्दल भेदभाव केला गेला आहे.

– अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा सुनावली आहे.

तर दुसरीकडे सरन्यायाधीश जे ए खेहर यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना शिक्षा सुनावलेल्या न्यायाधीश सी एन कर्नान यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानंही कारवाईचा बडगा उगारला आहे. न्यायालयं, न्यायप्रक्रियेला आणि सपूर्ण न्यायालयीन व्यवस्थेचा अवमान केल्याचा ठपका ठेवून सुप्रीम कोर्टानं त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्नान हे पहिलेच जज आहेत.

 

COMMENTS