एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मान्य नाही – राजू शेट्टी

एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मान्य नाही – राजू शेट्टी

दिल्ली – राज्यातल्या शेतक-यांना केवळ एक लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या या प्रस्तावाला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार विरोध केलाय. कोणत्याही परिस्थितीत ही 1 लाख रुपयांची कर्जमाफी मान्य होणार नाही असं राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय. काल दिल्लीत राजू शेट्टी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली तेंव्हा शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना ही बाब सांगितली. शेतक-यांना कमीत कमी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसंच नियमित कर्जभरणा-यांना 50 हजार रुपयांपर्य़ंतची व्याजमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय. शरद पवार यांनी 1 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची मागणी मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिली मात्र आपण त्याला विरोध केल्याचं  शेट्टी यांनी सांगितलं. शेट्टी यांच्या या विरोधानंतर आता इतर शेतकरी संघटना काय भूमिका घेतात याकडं सगळ्यांच लक्ष लागलंय.

COMMENTS