मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना

दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीचे भाकित केले आहे. दिल्लीत काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे भाकित वर्तवले आणि पक्षाच्या नेत्यांना मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रत्येक मतदारसंघावर पक्षाने लक्ष केंद्रीय करावं असही पवार यांनी सांगितलं. काँग्रेससोबत आघाडी करुनच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऑगस्टमध्ये पक्षाची पुन्हा एकदा बैठक होणार असून त्यामध्ये मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे.

COMMENTS