औरंगाबादमधील अमृता फडणवीस यांचा कार्यक्रम वादात, तिकीट विक्रीची जबाबदारी पोलिसांकडे !

औरंगाबादमधील अमृता फडणवीस यांचा कार्यक्रम वादात, तिकीट विक्रीची जबाबदारी पोलिसांकडे !

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला पोलीस रजनी हा कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे. हा कार्यक्रम माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या महत्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये अमृता फडणवीस या गुडविल अबँसिडरम्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच त्या या कार्यक्रमात गाणारही आहेत.

या कार्यक्रमाला भरमाठ तिकीट  ठेवण्यात आलं आहे. एका तिकीटाची किंमत 51 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. केवळ 400 तिकीटे यासाठी विक्री केली जाणार आहेत. ही तिकीटे विकण्याची जबाबदारी औरंगाबादमधील 15 पोलीस स्टेशनमधील पोलासांकडे देण्यात आल्याची माहिती आहे. इंग्रजी वर्तमानपत्र फ्री प्रेस जर्नल यांनी हे वृत्त दिलं आहे. कार्यक्रमानंतर त्या 400 श्रोत्यांना अमृता फडणवीस आणि इतर कलाकारांसोबत नाष्टा करण्याचीही संधी मिळणार आहे. पोलिसांकडे तिकीट विक्रीची जबाबदारी दिल्याने या बाबत वाद निर्माण झाला आहे. त्याच्यावर टीका होऊ लागली आहे.

तिकीट विक्रीचे काम दिल्यामुळे पोलिसांना शहरातील उद्योगक, हॉटेल व्यावसायिक, धावेवाले अशा अनेकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. पोलिस आयुक्तांनी याला दुजोरा दिला नसला तरी काही पोलिसांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही बाब फ्री प्रेस जर्नलकडे मान्य केली आहे. या कार्यक्रमात गोळा होणारा निधी हा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटंबिय आणि गरीबांच्या आरोग्यासाठी दिला जाणार आहे. आज संध्याकाळी हा कार्यक्रम होणार आहे.

COMMENTS