काँग्रेसच्या प्रगतीत राहुल गांधींचाच मोठा अडथळा, राणेंचा घणाघाती आरोप

काँग्रेसच्या प्रगतीत राहुल गांधींचाच मोठा अडथळा, राणेंचा घणाघाती आरोप

काँग्रेसला सध्याच्या बिकट परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर राहुल गांधी यांना बाजुला सारले पाहिजे असा घणाघाती आऱोप गोव्याचे नूतन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे. काँग्रेसच्या तिकीटावर निवडूण आलेल्या विश्वजीत राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रीमंडळात त्यांची आरोग्यमंत्री म्हणून वर्णी लागलीय. शपथविधीनंतर बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच  काँग्रेसला या बिकट परस्थितीतून बाहेर यायचं असेल तर राहुल गांधी यांना बाजुला करुन सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्याकडे पक्षाची धुरा सोपवायला पाहिजे असंही राणे म्हणाले. राहुल गांधी यांच्यासोबत काम करणे अवघड असल्याचं सांगत भाजपचं मोठं गुणगाण गायलं. भाजपमध्ये वरीष्ठ काम करणा-यांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे काम करायला मोकळीक मिळते असंही विश्वजीत राणे म्हणाले.

COMMENTS