अडवाणींविरोधात मोदींचे कट, कारस्थान असू शकते – भाजप नेते विनय कटियार

अडवाणींविरोधात मोदींचे कट, कारस्थान असू शकते – भाजप नेते विनय कटियार

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. त्यासाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टात मागणी केली होती. अगदी याच वेळी सीबीआयने कशी काय सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली असा सवाल करत या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कारस्थान असल्याचा आऱोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. सध्या राष्ट्रपतीपकाचे उमेदवार म्हणून अडवाणी यांचे नाव चर्चेत आहे. त्यामध्ये खोडा घालण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अडवाणींविरोधात कट कारस्थान केल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला होतो.

लालूप्रसाद यादव यांच्या या आरोपामध्ये तथ्य असू शकते असं खुद्द भाजपचे नेते विनय कटियार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या आरोपाला कटियार यांनी अप्रत्यक्षपणे सहमती दर्शवली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत कटियार यांनी हा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपताला अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. विनय कटियार हे उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ आणि मोठे भाजप नेते आहेत.

COMMENTS