नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात रंगली नेत्यांची फटकेबाजी !

नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात रंगली नेत्यांची फटकेबाजी !

सांगली – नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि युवा नटसम्राट म्हणून सुबोध भावे यांना गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात खरी रंगत आणली तरी नेत्यांच्या फटकेबाजीने.  माजी मंत्री पतंगराव कदम आणि संजय काका पाटील यांनी या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. जनता नेत्यापेक्षा अभिनेत्यावर अधिक प्रेम करते असं सांगत नेत्याच्या कामापेक्षा अभिनेत्याच्या कलेला अधिक दाद देते असं भाजपचे खासदार संजय काका पाटील म्हणाले. औताला जुंपलेल्या बैलासारखी नेत्यांची अवस्था असते, सकाळपासून रात्रीपर्यंत त्याला काम करावं लागतं. दिग्गज नेत्यांच्या सांगलीत राजकारण करणं सोप नाही असं संजयकाका म्हणाले.

माजी मंत्री पतंगराव कदम यांनी आपल्या खास शैलीत संजय काकांचं कधी कौतुक करत तर कधी चिमटे घेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचं नाव न घेता टीका केली. संजय काका भाजपचे  खासदार असले तरी ते काँग्रेसचे तरुण तडफदार कार्यकर्ते असल्याचं पतंगराव म्हणाले. संजय काका हे नितीमुल्य ठेऊन काम करतात त्यामुळे आमचा नेहमीच त्यांना पाठिंबा असेल अशा शब्दात पंतगराव कदम यांनी खासदार पाटील यांचं कौतुक केलं. तर आमचं कोंबड उजाडलं अस काही जनांना वाटत,  मात्र बनवाबनवी करून तात्पुरते यश मिळते असं टोला त्यांनी नाव न घेता पृथ्वीराज देशमुखांना लगावला.

COMMENTS