काँग्रेस आमदाराला अटक, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप !

काँग्रेस आमदाराला अटक, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप !

केरळमध्ये एका 51 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला अटक करण्यात आली आहे. एम विन्सेट असं अटक केलेल्या आमदाराचे नाव आहे. तिरुअनंतरपुरम मधील एका 51 वर्षाच्या महिलेनं झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेवर वेळीच उपचार केल्यामुळे ती वाचली. त्यानंतर त्या महिलेची आत्महत्या कशामुळे केली अशी चौकशी केल्यानंतर तिने आमदार एम विन्सेट हा आपल्याला नेहमी त्रास देत होता. तसंच त्याने आपला लैंगिक छळ केल्याचाही आरोप केला. त्यामुळे आपण जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता असं सांगितलं. त्या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आमदार एम विन्सेट यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान आमदार विन्सेटने बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. माझ्याविरोधात रचलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान काँग्रेसमधूनही विन्सेन्ट यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव येत आहे. त्यानुसार ते राजीनामा देण्याची शक्यता आहे.

COMMENTS