पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्यासाठी नामदेव शास्त्रींना पत्र !

पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्यासाठी नामदेव शास्त्रींना पत्र !

मुंबई –  पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा व्हावा, याकरीता पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना पत्र  लिहिले आहे. हे पत्र आज सकाळी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी जि. प. सभापती अर्जून शिरसाठ यांनी महंताना पत्र दिले.

आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते. लोकांची तळमळ पाहून कोणी मध्यस्थी नको म्हणून मीच विनंती करते, शेवटी मी लहानच आहे. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते पुन्हा कोयता घेऊन राबायला जातील, त्यांना ऊर्जा मिळते. मी आतापर्यंत कोणापुढे झुकले नाही, मात्र समाजासाठी नतमस्तक होते. मला दिवाळीची माहेरची भेट द्या, असं पंकजा मुंडे यांनी पत्रात लिहिलं आहे.

मात्र, महंतांनी गडावरील भाषणास विरोध केला. पंकजांनी अत्यंत भावनिक असे हे पत्र लिहिले आहे.  गडावर मेळाव्‍यास परवानगी मिळावी, यासाठी स्‍वतंत्र पत्र तालुका प्रशासनाला दिले आहे.

दरम्‍यान, भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद आहे. दसरा मेळावा घेण्यास महंतांनी पंकजा मुंडे यांना असलेला विरोध कायम ठेवला आहे. तर गडावर दसरा मेळावा घेण्यावर मुंडे समर्थक ठाम आहेत.

 

COMMENTS