पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस

कोल्हापूर जिल्‍ह्‍यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्‍या चार-पाच दिवसांपासून कोल्‍हापूरकरांना उकाड्याने हैराण करून सोडले होते. आज सकाळपासूनही उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास पावसाने जिल्‍ह्‍यात अनेक ठिकाणी हजेरी लावली. शहरातील लक्ष्मीपूरीसह अनेक ठिकाणी दुकानांमध्ये, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे.

सांगलीत शिराळा तालुक्यातील गुढेपाचगणी येथे गारांसह मुसळधार पाऊस झाला असून तासगांव तालुक्यातील सावळज सह परीसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

सातारा जिल्ह्यातील कराड,उंब्रज,पाटण परिसरात अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने उष्णतेने हॆराण झालेले सातारकर सुखावले, प्रचंड वादळी वा-यासह व वीजेच्या कडकडात जोरदार पाउस झाला, या पावसामुळे डाळींब व केळी पीकाचे नुकसान झाले आहे.

 

COMMENTS