पैशासाठी भाजप आमदाराची कंत्राटदाराला धमकी, पोलिसांत तक्रार दाखल !

पैशासाठी भाजप आमदाराची कंत्राटदाराला धमकी, पोलिसांत तक्रार दाखल !

यवतमाळ – भाजपचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे आमदार राजू तोडसाम अडचणीत सापडले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील एका कंत्राटदाराला पैशासाठी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे.  या प्रकरणी ज्यांना धमकी दिली ते कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी यांनी वडगाव रोड पोलिस ठाण्यात राजू तोडसाम विरोधात तक्रार दाखल केली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये राजू तोडसाम हे सरळसरळ कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांना पैसे मागत असल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे कंत्राटदार मंत्री येरावार यांच्याकडे जाण्याची भाषा करताच आमदार थेट CM चे नाव घेत आहेत. कंत्राटदाराच्या पुण्यात शिकणाऱ्या मुलाचा अपघात झालाय व तो 9 महिने झाले कोमात आहे. अशा स्थितीत भाजपा आमदाराने खंडणीसाठी फोन केल्याने कंत्राटदार चांगलाच संतप्त झालाय. याही स्थितीत भाजपा आमदार त्याला धमकी देतोय, “पैसे देशील तरच माझ्या एरियात काम करायचे!”

 

 

 

 

COMMENTS