हिंसाचार घडवण्यासाठी डेरा सच्चाने दिले 5 कोटी !

हिंसाचार घडवण्यासाठी डेरा सच्चाने दिले 5 कोटी !

डेरा सच्चा प्रमुख बाबा राम रहिमला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. हा झालेला हिंसाचार पुर्वनियोजीत असल्याची धक्कादायक माहिती  आता समोर आली आहे. तसेच रामरहीम याला शिक्षा सुनावताच हिंसाचार घडवून आणण्यासाठी डेरा सच्चाने 5 कोटी रुपये दिले होते, अशी माहिती एसआयटीच्या तपासात उघड झाली आहे.

डेराचा पंचकुला शाखेचा प्रमुख चमकौर सिंग हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याच्या मार्फत ही रक्कम दिल्याचे या तपासात उघड झाले आहे. रामरहीमला पंचकुला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर हिंसा भडकविण्याचा तो कट होता आणि हा कट डेरा सच्चा सौदाने रचला होता. त्यासाठी दोन लोकांना 5 कोटी रूपये देण्यात आले होते. हनीप्रीत इन्सान, आदित्य इन्सान आणि सुरेंद्र धीमन इन्सान यांनी ही रक्कम दिल्याचे उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून तो आणि त्याचे कुटुंबीय गायब आहेत.

 

 

 

COMMENTS