बी-बियाण्यांसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी केली दगडाची पेरणी !

बी-बियाण्यांसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी केली दगडाची पेरणी !

बुलडाणा –  सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. तसेच कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत दहा हजार रुपये देणार असल्याचे ही घोषणा करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया मिळालेला नाही. यामुळे  बी-बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी पैसे नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी चक्क दगडाची पेरणी करून सरकारचा निषेध केला.
बुलडाण्यातील खामगाव तालुक्यात खुटपूरी गोपाल काकडे या शेतकऱ्याच्या शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनोखे आंदोलन केले. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतीची संपूर्ण मशागत झालेली आहे. मात्र शेतकऱ्याजवळ बी-बियाणे घेऊन पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने शेतात दगड आणि रेतीची पेरणी केली. यामधून जे उगवेल ते सरकारला विकणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS