ब्रेकिंग न्यूज – सोलापूरमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा कार्यक्रम बंद पाडला !

ब्रेकिंग न्यूज – सोलापूरमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा कार्यक्रम बंद पाडला !

सोलापूर – राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आज शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी सोलापूरमध्ये आले होते. या कार्यक्रमात आहिल्याबाई युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांच्यावर भंडारा उधळून त्यांचा कार्यक्रम काही काळ बंद पाडला. यावेळी कार्यकर्त्यांनी तावडे आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची आंदोलकांची मागणी आहे. या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याही आंदोलकांचा आरोप आहे.

COMMENTS