माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन !

माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन !

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदार राजीव राजळे यांचे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून राजळे हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 2014 मध्ये राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे या पाथर्डीच्या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. अतिशय तरुण वयातच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे राजळे हे भाच्चे होते.

COMMENTS