नोटबंदीला विरोध करणारे रघुराम राजन अर्थशास्त्रासाठीच्या नोबेलच्या शर्यतीमध्ये !

नोटबंदीला विरोध करणारे रघुराम राजन अर्थशास्त्रासाठीच्या नोबेलच्या शर्यतीमध्ये !

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे अर्थशास्त्रासाठी देण्यात येणा-या नोबल पारितोषीकाच्या शर्यतीमध्ये आहेत. अमेरिकेच्या प्रसिद्ध दी वॉल स्ट्रीट जर्नल या इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.

अर्थशास्त्राच्या नोबल पारितोषीकासाठी अंतिम 6 नावे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये रघुराम राजन यांचा समावेश आहे. क्लॅरिव्हेट अनॅलिटिक्स या कंपनी शास्त्रीय पद्धतीने संशोधन करुन सहा जणांची यादी जाहीर केली आहे.

रघुराम राजन हे 3 वर्ष रिझर्व्ह बँकेचे गव्हरनर होते. या काळात त्यांनी कॉर्पोरेट फायनान्स या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल नोबल पारितोषीकाच्या निवड समितीने घेतली आहे. अर्थशास्त्रासाठीचे नोबेलचे पारितोषीक हे सोमवारी जाहीर होणार आहे.

रघुराम राजन यांचं नावं 6 जणांच्या यादीत आहे. त्यांचं नाव आघाडीवर आहे असं नाही मात्र त्यांना जिंकण्याची संधी आहे असंही दी वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीमध्ये म्हटलं आहे. राजन यांना पारितोषीक मिळाले तर तो त्यांचा आणि देशाचा मोठा सन्मान होईलच. मात्र अंतिम सहा जणांच्या यादीमध्ये स्थान मिळवणे हाही त्यांचा आणि देशाचा मोठा सन्मानच आहे.

रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी नोटीबंदीला विरोध केला होता.  त्यामुळेच राजन यांना आरबीआयचे गव्हर्नर म्हणून दुसरी टर्म मिळाली नाही अशीही चर्चा होती. नोटबंदीचा आजचा परिणाम लक्षात घेतला तर राजन यांनी त्यावेळी दर्शवलेला विरोध किती रास्त होता हेच दिसून येत आहे.

COMMENTS