मोदींच्या नव्या शिलेदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्रिपद, शिवसेनेला स्थान नाही

मोदींच्या नव्या शिलेदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्रिपद, शिवसेनेला स्थान नाही

नवी दिल्ली – आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. एकूण 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले आहे, तर 9 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.  नव्या मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिकारी आहेत. नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमन, पियुष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळालं असून, त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.

राज्यमंत्रिपदी निवड झालेले मंत्री

1) अश्विनीकुमार चौबे : पहिल्यांदाच खासदार, भागलपूर येथून आमदार आणि बिहारचे आरोग्यमंत्री होते.
2) वीरेंद्र कुमार- लोकसभा खासदार, जे.पी. मूव्हमेंटशी निगडीत, टिकमगढ, मध्यप्रदेशमधून ६ वेळा खासदार
3) अनंत कुमार हेगडे- कर्नाटक लोकसभा खासदार
4) राजकुमार सिंग (आर. के. सिंग)- आरा बिहार खासदार, माजी गृहसचिव
5) शिवप्रताप शुक्ला- राज्यमंत्री होण्याची शक्यता, गोरखपूर, उत्तर प्रदेश
6) हरदीपसिंग पुरी- माजी आयएफएस अधिकारी, अलिकडेच भाजपत प्रवेश
7) सत्यपाल सिंग- मुंबई पोलिस माजी आयुक्त, बागपत येथून पहिल्यांदाच खासदार
8) अल्फोन्ज कन्ननाथम – केरळ, माजी आयएएस अधिकारी
9) गजेंद्रसिंग शेखावत- जोधपूर, राजस्थान

 

COMMENTS