राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेची काल वेगळी आज वेगळी भूमिका ? नेमका पाठिंबा कोणाला ?

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेची काल वेगळी आज वेगळी भूमिका ? नेमका पाठिंबा कोणाला ?

राष्ट्रपतीपदासाठी काल संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव सुचवलं होतं. तर आज सामनामधून संरसंघचालकांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेची राष्ट्रपतीपदाबाबतची नेमकी भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी सुरूवातील सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव सुचवलं होतं. मात्र मोहन भागवत यांनी या पदासाठी आपण इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. डाव्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू केल्यानंतर काल संजय राऊत यांनी शिवसेनाही शरद पवार यांना पाठिंबा देईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दुस-याच दिवशी आजही सरसंघचालक मोहन भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं सामनाच्या संपादकीयमधून स्पष्ट करण्यात आलं. मात्र भागवतांनी नकार दिलेला असल्यामुळे त्याऐवजी कोण याबाबत संपादकीय मध्ये काही स्पष्टता नाही. त्यामुळे शिवसेनेची राष्ट्रपतीपदासाठी नेकमी काय भूमिका आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

COMMENTS