मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मंजूर

मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मंजूर

मुंबई – मालेगावातील 2008 सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सबळ पुराव्याअभावी हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.  दुसरीकडे याच प्रकरणातील दुसरे आरोपी कर्नल प्रसाद पुरोहीत यांना मात्र जामीन देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंहला 5 लाखांच्या हमीवर जामीन मंजूर झाला. त्याशिवाय तेवढ्याच रकमेच्या दोन जामीनदार, पासपोर्ट एनआयएकडे सोपवणे आणि तारखांना कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला.

COMMENTS