होय, मला शिवसेनेनं मुख्यमंत्री केले पण… – नारायण राणे

होय, मला शिवसेनेनं मुख्यमंत्री केले पण… – नारायण राणे

मुंबई – घाटकोरपच्या इमारत दुर्घेटनेवरुन आज विधान परिषदेमध्ये नारायण राणे विरुद्ध नीलम गो-हे यांच्यात जोरदार चकमक उडाली. दुर्घटनेवरुन राणे यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली. त्यावर नीलम गो-यांनी राणेंना उत्तर दिलं. तसंच शिवसनेनेच तुम्हाला मुख्यमंत्री केले असं सांगितलं. त्याला राणे यांनीही उत्तर दिलं. होय, मला शिवसेनेनं मुख्यमंत्री केलं हे खरं आहे. त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानतो. मात्र उगीच कोणीही कोणाला मुख्यमंत्री करत नाही. मुख्यमंत्री असताना आणि शिवसेनेत 39 वर्ष असताना माझ्याएवढं आजच्या शिवेसनेच्या नेते आणि मंत्र्यांपैकी कुणीच केलं नाही. माझ्यकडे तेवढी क्षमता होती म्हणून मला मुख्यमंत्रीपद दिलं. आणि मी त्याला न्याय दिला या शब्दात राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना उत्तर दिलं.

 

COMMENTS