अहमदनगरमध्ये भाजपला धक्का, आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या गळाला!

अहमदनगरमध्ये भाजपला धक्का, आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या गळाला!

अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे आणि बाणेश्वर दूध संघाचे अध्यक्ष रोहिदास कर्डिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. रोहिदास कर्डिले यांची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा झाली असून ते लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान आमदार कर्डिले यांच्या विधानसभेसह इतर सर्व निवडणुकांचे संघटन, आर्थिक व्यवस्थापन त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले पाहत होते. परंतु कर्डिले यांचे पूत्र अक्षय कर्डिले राजकारणात सक्रिय झाल्यानंतर रोहिदास कर्डिले यांच्यावरील जबाबदारी कमी होत गेली. त्याचा परिणाम म्हणून मागील ३ ते ४ वर्षापासून रोहिदास कर्डिले हे आमदार कर्डिले यांच्यापासून दुरावले गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS