शिवसेनेच्या ‘या’ चार उमेदवारांची नावे उद्धव ठाकरेंनी केली जाहीर !

शिवसेनेच्या ‘या’ चार उमेदवारांची नावे उद्धव ठाकरेंनी केली जाहीर !

अमरावती – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या चार उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  अमरावतीत युतीच्या झालेल्या मेळाव्यात वाशीममधून भावना गवळी, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, तर रामटेकमधून कृपाल तुमाने यांची नावे जाहीर केली आहेत. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

दरम्यान शिवसेना-भाजप युती ही देशातील आशा आहे आणि ती आशा संपली तर देशात अंधार पसरेल. आपणं आजपर्यंत जे काही केलं ते उघड उघड केलं. मनाला पटत नसेल ते बोलायचो. संघर्ष झाला तो केवळ राज्याच्या हितासाठी झाला असे मतं यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलं.तसेच भाजप शिवसेना युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. ती कधीही तुटणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी इशारा दिला.

COMMENTS