अजित पवारांशी बच्चू कडूंनी घेतला पंगा

अजित पवारांशी बच्चू कडूंनी घेतला पंगा

अमरावती – राज्यात राज्यातील दंबग व्यक्तीमत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख आहे. आपल्या आंदोलनाच्या अनोख्या स्टाईलमुळे अंपग, शेतकरी आणि गरीबांचा आपला भिडू बच्चू कडू यांची प्रचंड क्रेज आहे. हे दोन्ही नेते सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. दोघेही सरकारमध्ये असो वा विरोधात त्यांची प्रशासन आणि एकूण राजकीय वर्तुळात चांगलाच दबदबा आहे. पण हेच दोन्ही नेते आज एकमेकांच्या समोर येतात. सरकार मध्ये असूनही बच्चू कडूंनी अजितदादांना भरसभेत पंगा घेतला.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान निधीच्या मागणीवरून राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला.

या बैठकीत लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यायासाठी ३०० कोटीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे यवतमाळ ३२५ कोटी, बुलढाणा २९५, वाशिम १८५ तर अकोला साठी १८५ कोटीचा निधी देण्यात आला. मात्र या निधीवर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यासाठी थोडा निधी वाढवून दिल्यामुळे वाद संपुष्टात आला असला तरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मिळालेल्या निधीवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दोघांमधील वाद कुठपर्यंत पोहचतो आणि त्यातून काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे पुन्हा एकदा आघाडीमधील बिघाडी समोर आली.

COMMENTS