अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते टपरीवर !

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते टपरीवर !

हिंगोली – कोणताही अनमान न बाळकता रविवारी रात्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह एका टपरीवर चहा आणि भजीचा आस्वाद घेतला. मराठावाड्यात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु आहे या यात्रेदरम्यान माहूर येथील सभा संपवून हिंगोलीकडे जाताना कळमनुरीजवळील एका टपरीवर अजित पवारांनी चहा घेतला. त्यावेळी राष्ट्रवादीचे इतरही नेते उपस्थित होते.

चहाची तल्लफ लागल्यामुळे अजित पवारांनी एका टपरीवर गाडी थांबवायला सांगितली. माळेगाव फाट्यावर गाडी थांबवून अजित दादांनी तिथे चहा, भजीचा आस्वाद घेतला. अजित पवार थांबले म्हटल्यावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह सर्वच नेते टपरीवर चहा प्यायला थांबले होते. चहा घेताना त्यांनी हॉटेल मालका़शी गप्पा मारून त्यांचे झालेले 100 रुपये बिलही दिले. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात निवडणूक दौर्‍यात अशा प्रकारे अनेक वेळा टपरीवर थांबून चहा आणि गुजराती पदार्थांचा आस्वाद घेतला होता.

COMMENTS